Dainik Maval News : शासनाच्या नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार वडगाव नगरपंचायत हद्दीतील थकीत मिळकत धारकांची मालमत्ता करावरील शास्ती (दंड) अंशतः माफ करण्यासाठी अभय योजना प्रोत्साहनात्मक राबविण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला असून, नागरिकांनी योजनेचा लाभ घेऊन मालमत्ता कर भरावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने १९ मे २०२५ पर्यंतच्या मालमत्ता करावरील शास्ती (दंडात्मक व्याज) माफीसाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या थकबाकीदार मिळकत धारकांची शास्ती (दंडात्मक व्याज) ची थकबाकी आहे, अशा मिळकत धारकांनी नगर परिषद मालमत्ता करावरील शास्ती अंशतः किंवा पूर्णतः माफ करण्यासाठी शास्ती वगळून मिळकत कराची पूर्ण रक्कम भरून विहीत नमुन्यात अर्ज नगरपंचायत कार्यालयाकडे सादर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी निकम यांनी केले आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करण्याची अखेरची मुदत असून, ही योजना फक्त सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिताच लागू आहे. तसेच ही योजना थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी प्रोत्साहनपर योजना आहे. जे मिळकतधारक या योजनेचा, अभय योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मालमत्ताधारकांनी सवलत मागणीकरता परिपूर्ण प्रस्ताव नगरपंचायत कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
तसेच www.npvadgaon.in या वेबसाईटवर वर उपलब्ध आहे, त्या नमुन्यातच अर्ज सादर करावा. अर्जासोबत आधारकार्ड,सन २०२५-२६ च्या मालमत्ताकराच्या मागणी बिलाची छायाप्रत व शास्ती वगळून संपूर्ण कराची रकम भरलेल्या पावतीची छायाप्रत जोडणे आवश्यक असल्याचे मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या