Dainik Maval News : टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी : टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीकडून गावातील फळणे-टाकवे मुख्य रस्त्याच्या कडेला कचरा गोळा टाकत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी, डास, भटके कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. याच रस्त्यावरुन आंदर मावळातील पस्तीस गावातील नागरिक, तसेच पावसाळ्यात मुंबई, पुणे याठिकाणचे पर्यटक या ठिकाणाहून पुढे वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी जातात.
फळणेतील विद्यार्थ्यांना या कचऱ्याच्या दुर्गंधीचा वास सहन करुन टाकवेत शाळेत चालत जावे लागत असल्याने कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी फळणे ग्रामस्थांकडून टाकवे ग्रामपंचायतील लेखी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सदर कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तात्काळ हा कचरा हटवुन योग्य ठिकाणी पंधरा दिवसांत विल्हेवाट लावण्यात यावी, अन्यथा सदर कचरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर टाकु असा इशारा फळणे ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विलास मालपोटे, शालेय समिती अध्यक्ष संदीप मालपोटे, सुनील मालपोट अजित मालपोटे संतोष मालपोटे, विठ्ठल मालपोटे, विजय ओव्हाळ आदीजण उपस्थितीत होते.
सदर कचरा टाकण्यासाठी फळणे व बेलज येथील गायरान जागेत कचरा टाकुन देण्यास स्थानिक ग्रामस्थ विरोध करत आहेत. तसेच टाकवे गावांसाठी स्वतंत्र गायरान जागा उपलब्ध नसल्याने हा प्रश्न गंभीर होत गेला आहे. आम्ही शासनाकडे जागेची मागणी केली., जागा उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणचा कचरा हाटवू. – अविनाश असवले, सरपंच, टाकवे ग्रामपंचायत
आंदर मावळची अर्थिक राजधानी म्हणून टाकवे ग्रामपंचायतची ओळख आहे. परंतु कचऱ्यासारखा मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीला वेळ नाही, ही मोठी शोकांतिका आहे. येत्या पंधरा दिवसांत त्या ठिकाणचा कचरा न हटवल्यास आम्ही तो कचरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून टाकू. – विलास मालपोटे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, मावळ
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या