Dainik Maval News : कामशेत शहरात रविवारी (दि. 3 ) रात्री एका कापड दुकानात चोरीचा प्रयत्न झाला. परंतु सतर्क ग्रामस्थांनी हा प्रयत्न उधळून लावत चोरट्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
कामशेत शहरात श्री छत्रपती शिवाजी चौकात रॉयल कलेक्शन कापड दुकान आहे. तिथे चोरट्यासह चार महिला आल्या होत्या. त्यांनी खरेदीच्या बहाण्याने कपड्यांची चोरी केली. ही बाब दुकानमालक धीरज परमार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली, तेव्हा तेथील ग्रामस्थ रोहिदास वाळुंज आणि इतर नागरिकांनी चोरट्याला पकडले.
परंतु ह्या गोंधळात चोरासह आलेल्या चार महिला पसार झाल्या. या प्रकरणात संतोष विनायक गायकवाड (वय २५, रा. अंबरनाथ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून नागरिकांच्या सतर्कतेचे कौतूक होत आहे.
दरम्यान, ग्रामस्थ रोहिदास वाळुंज यांनी याबाबत बोलताना सांगितले की, गेल्या वर्षभरात कामशेत परिसरात सुमारे २५ चोऱ्या झाल्या. त्यात एकही आरोपी पोलिसांना पकडता आला नाही. रविवारी चोरी प्रकरणातही पोलिसांना चोर पकडता आला नसून ग्रामस्थांनी तो पकडला. पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
रविवारी रात्री हा प्रकार घडल्यानंतर सोमवारी पहाटे देखील एका किराणा दुकानात चोरट्यांनी हात साफ केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला असून चोरट्यांनी येथून रोकड आणि इतर वस्तू असा २० हजारांचा ऐवज लंपास केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर यामुळे प्रश्न निर्माण होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या