Dainik Maval News : मावळ तालुका सहकारी संस्था सहाय्यक निबंधक कार्यालय व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सहकार्याने तालुक्यातील सर्व गृहरचना संस्थांसाठी पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत गृहरचना संस्थांना द्यावयाच्या अनुदानाबाबत (सबसिडी) चर्चासत्र रविवारी (दि. १०) सकाळी १० वाजता तळेगाव स्टेशन येथील यशोधाम हॉलमध्ये (तपोधाम कॉलनी) आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी दिली.
सदर चर्चासत्रात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून तज्ज्ञ अभियंता व सौर ऊर्जा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ते पीएम सूर्यघर योजना व त्या अंतर्गत गृहरचना संस्थांना द्यावयाच्या अनुदानाबाबत (सबसिडी) मार्गदर्शन करणार आहेत. मावळ तालुक्यातील सर्व सहकारी गृहरचना संस्थांचे संचालक मंडळ व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कांदळकर यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या