Dainik Maval News : आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि सर्व वैद्यकीय सेवासुविधांनी सुसज्ज कार्डिअॅक रुग्णवाहिका टाकवे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवेत दाखल झाली आहे.
ह्युंदाई कंपनीच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून कार्डिअॅक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून टाकवे प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या २७ गावातील नागरिकांना या रुग्णवाहिकेचा मोठा फायदा आहे.
रुग्णवाहिकेच्या लोकार्पण प्रसंगी सरपंच अविनाश असवले, आरोग्य अधिकारी डॉ नागेश ढवळे, मा उपसरपंच परशुराम मालपोटे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मतकर, आरोग्य सहाय्यक अमित बागडे, आरोग्य सहाय्यक ज्ञानेश्वर राऊत, आरोग्य सेवक संजय सावत आदीजण उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
– चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
– मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर