व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर

मावळ तालुक्यासाठी ही बैठक ऐतिहासिक ठरली असून, आमदार सुनील शेळके यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि पाठपुराव्यामुळे आरोग्य सेवांच्या विस्ताराला नवा आयाम मिळाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 8, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Health services in Maval new facilities approved for Vadgaon Kanhe Lonavala Sub-District Hospitals

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील वडगाव-कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत कान्हे उपजिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्यसेवांबरोबरच लवकरच येथे सिटी-स्कॅन, एम.आर.आय, कॅथलॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. आबिटकर यांनी यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्याचे निर्देश दिले असून, संबंधित प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

आमदार सुनील शेळके यांचा ठाम पाठपुरावा : मावळसाठी ठोस निर्णय
सदर बैठकीत आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्टपणे सांगितले. वडगाव-कान्हे आणि लोणावळा येथील रुग्णालयांमध्ये अनेक सुविधांची कमतरता असून, ती तातडीने भरून काढावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या महत्त्वाच्या सुविधांना मंजुरी मिळाल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनीही मान्य केले.

लोणावळ्यातही डायलेसिस सेंटर आणि सिटी-स्कॅन सेंटर मंजूर
लोणावळा उपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस सेंटर सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे, तसेच सिटी-स्कॅन सेंटरचे काम तात्काळ सुरु करण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी दिल्या. यामुळे परिसरातील गंभीर रुग्णांना पुण्याला जावे लागणार नाही, अशी नागरिकांमध्ये प्रतिक्रिया उमटली.

रुग्णसेवेत अडथळा ठरणारी रिक्त पदे भरण्यासाठीही ठोस पावले उचलण्यात आली. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आदी पदांवर भरती तात्काळ करण्याचे आदेश देण्यात आले, तसेच पदनिर्मिती संदर्भातील प्रस्तावावर आरोग्यमंत्र्यांनी त्वरित सही केली.

या बैठकीस आरोग्य उपसचिव धुळे, आरोग्य संचालक अंबाडेकर, सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत, उपसंचालक नागनाथ यमपल्ले, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता धनराज दराडे, वैद्यकीय अधीक्षक आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मावळ तालुक्यासाठी ही बैठक ऐतिहासिक ठरली असून, आमदार सुनील शेळके यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि पाठपुराव्यामुळे आरोग्य सेवांच्या विस्ताराला नवा आयाम मिळाला आहे. हे निर्णय प्रत्यक्षात आल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या


Previous Post

‘मनरेगा’ योजनेंतर्गत सुधारणा, नव्या उपक्रमांची आखणी ; आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक संपन्न

Next Post

भटक्या श्वानांच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी, वडगाव येथील घटना, स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
dog

भटक्या श्वानांच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी, वडगाव येथील घटना, स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
crime-arrested

गांजा विक्री प्रकरणी एकाला रंगेहात अटक, एका महिलेवर देखील गुन्हा दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.