Dainik Maval News : रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेतील इयत्ता दहावीच्या १३० विद्यार्थ्यांना ‘आयडल स्टडी ॲप’ चे मोफत वाटप करण्यात आले.
ही शैक्षणिक ॲप विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मदत करण्यासाठी आणि परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे डिजिटल शिक्षणाची उपलब्धता वाढून विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मदत होईल, अशी भावना शिक्षकवर्ग आणि पालकांनी व्यक्त केली.
या उपक्रमामध्ये रोटरीचे मान्यवर उपस्थित होते. ॲप समन्वयक संतोष सावंत, रोटरी क्लब मावळचे अध्यक्ष विशाल सांगडे, रोटरी मावळ सचिव रेश्मा फडतरे, प्रकल्प प्रमुख राजेंद्र दळवी, शाहीन शेख हेमा देशमुख, सुमन जाधव, गणेश ठोंबरे, वंदना मराठे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात विशाल सांगडे, रेश्मा फडतरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना या ॲपचा योग्य वापर करून परीक्षेत यश मिळवण्याचे आवाहन केले. संतोष सावंत यांनी विद्यार्थ्यांना ॲप संदर्भात सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या शैक्षणिक मदतीने डिजिटल शिक्षणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. विद्यार्थ्यांना ॲपचे महत्त्व पटवून देत त्याचा योग्य वापर करण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत काळे व आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका शितल शेटे यांनी मानले. त्यांनी रोटरी क्लबच्या सहकार्याबद्दल तीनही शाळेच्यावतीने मनःपूर्वक आभार मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
– चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
– मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर