Dainik Maval News : सांगिसे (ता. मावळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुषमा टाकळकर यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या मावळत्या उपसरपंच अनुसया शेडगे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त पदासाठी निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी सुषमा टाकळकर यांची उपसरपंचदी निवड करण्यात आली. ग्रामसेवक रामदास शिंदे यांनी ही निवड जाहीर केली.
सरपंच सुनीता योगेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड सभा पार पडली. यावेळी, नितीन ढवळे, अनुसया शेडगे, रेश्मा ढमाले, तुकाराम टाकळकर, कैलास गरुड, उमेश थोरात हे ग्रामपंचायत सदस्य, तसेच बबनराव टाकळकर, भाऊसाहेब टाकळकर, सदाशिव टाकळकर, भाऊसाहेब बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.
सुषमा टाकळकर यांची उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. तसेच, उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना, सर्वांना सोबत घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा विकास करण्याचा व विविध उपक्रम राबविण्याचा मानस सुषमा टाकळकर यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी सनी जाधव, सुधीर लालगुडे, संतोष टाकळकर, वसंतराव गायकवाड, स्वामी बांगर, सुनील बांगर, बबनराव टाकळकर, शिवाजीराव टाकळकर, वसंतराव टाकळकर, शिवाजीराव साबळे, विठ्ठल शिरसट, योगेश शिंदे, नवनाथ टाकळकर, पप्पू साबळे, प्रसाद गव्हाणे, पप्पू येवले, ज्ञानेश्वर थोरवे, मयूर दळवी, प्रवीण थोरवे, चेतन ढमाले, शशिकांत शिंदे, शंकर साबळे, शामभाऊ टाकळकर, परशुराम टाकळकर, उमेश टाकळकर, दशरथ साबळे, वैभव दुर्गे, रुपेश शिंदे, सतीश भांगरे, किरण टाकळकर, संजय जाधव, आकाश जाधव, पप्पू शेडगे, बबन घरदाळे, रोहिदास कालेकर, स्वप्नील ढाकोल, मच्छिंद्र जांभुळकर, पप्पू मोहोळ, सुमित टाकळकर, कुणाल टाकळकर, मनोज टाकळकर, आदित्य टाकळकर, रितेश घरदाळे इत्यादी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
– चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
– मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर

