Dainik Maval News : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत शिवछत्रपती क्रीडापीठ, बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत गहुंजे येथील आंचल मोरे हिची फुटबॉल खेळासाठी क्रीडा प्रबोधिनी, पुणे येथे सरळ प्रवेशासाठी निवड झाली आहे.
ही निवड २०२५–२६ या शैक्षणिक वर्षासाठी करण्यात आली असून, राज्यातील प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण, संतुलित आहार व अत्याधुनिक क्रीडा सुविधा देण्यासाठी ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये फुटबॉल, ज्युदो, सायकलिंग, जिम्नॅस्टिक्स आणि जलतरण अशा विविध खेळांसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
आंचल मोरे ही अत्यंत मेहनती, शिस्तप्रिय व उत्साही खेळाडू आहे. तिच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका विजीला राजकुमार, निखिल बोडके, पोर्णिमा बोडके, साहेबराव बोडके यांनी आनंद व्यक्त केला आहे. या उल्लेखनीय निवडीमुळे गहुंजे परिसरात, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकवर्गात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
– चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
– मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर