Dainik Maval News : मावळ तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रीय कुस्तीगीर चंद्रकांत आप्पासाहेब सातकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. १२ ऑगस्ट) कान्हे (ता. मावळ) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पै. सातकर यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा देत मान्यरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
पै. चंद्रकांत सातकर (वय ८४ वर्षे) यांचे सोमवारी पुण्यात वयाच्या ८४ व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले. मंगळवारी त्यांचा अंत्यविधी पार पडला. यावेळी त्यांचा मुलगा अजित सातकर यांनी पार्थिवाला अग्निडाग दिला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी परिवहन मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री मदन बाफना, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जेष्ठ नेते माऊली दाभाडे, शंकरराव शेळके, बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, रामदास काकडे, बाळासाहेब नेवाळे, पै. मारुती आडकर, पै. अमोल बुचुडे, विजय जाधव, संग्राम मोहोळ, नरहरी चोरगे, के.पी.पाटील, बाबुराव वायकर, संभाजी राक्षे, बाळासाहेब ढोरे, यशवंत मोहोळ, राजू खांडभोर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
अनेकांनी पै. चंद्रकांत सातकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, सातकर हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. प्रामाणिक, निर्मळ व सज्जन असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते त्यांना ओळखत होते. त्यांच्यावर पुस्तक तयार करण्याची सूचना त्यांनी केली. सतीश पाटील म्हणाले, सातकर यांनी अगदी निष्ठेने राजकारण केले. कुस्ती क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला व नातीही जपण्याचे काम केले. हिरामण सातकर यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले. गुलाब वाघोले व अतुल सातकर यांनी सूत्रसंचालन केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
– चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
– मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर
