Dainik Maval News : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्र पोलीस विभाग पुणे, संहिता प्रतिष्ठान, संकल्प इंग्लिश मीडियम स्कूल, पवना विद्या मंदिर यांच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान २०२५ पवनानगर येथे संपन्न झाले. यामध्ये सर्व शालेय विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ विरोधी विविध घोषणा, पोस्टर शो, तसेच मानवी साखळी करत चौका चौकातून रॅली काढत अमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली.
यावेळी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक प्रशांतआवारे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक लक्ष्मण भालेराव,बाबासाहेब काळे,माजी उपसरपंच रमेश कालेकर,माजी उपसरपंच संजय मोहोळ,पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे,व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष कैलास कालेकर, सजन बोहरा , उपाध्यक्ष संजय गांधी,राहुल मोहोळ,नीलेश मोहोळ, बाळू कालेकर, लक्ष्मण कालेकर,दिनकर आढाव,सुरेश कालेकर, उमेश रिजबुड,संकल्प शाळेचे मुख्याध्यापक राहूल सोनवणे, पर्यवेक्षिका शितल शेटे, राजकुमार वरघडे, बाळू कदम, गणेश ठोंबरे,कैलास येवले,कल्याणी पडवळ, केतकी गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तरुण युवा पिढीला या अमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात. त्याचबरोबर पुनर्वसन प्रकल्प यावर विशेष काम करतात. शाळेच्या दोनशे मीटरच्या परिसरामध्ये कोणत्याही तंबाखू युक्त पदार्थांचे तसेच आमली पदार्थाची विक्री करण्यात येऊ नये. याबाबत उपस्थित व्यापारीपेठेतील सर्व व्यापाऱ्यांना सूचित करण्यात आले.
यावेळी शासनाच्या हर घर तिरंगा घर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत तिरंगा ध्वज घेऊन जनजागृतीसाठी रॅली काढत घोषणा देत जन जागृती केली यामध्ये संकल्प इंग्लिश स्कूल व पवना विद्या मंदिर या शाळांचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शासनामार्फत तंबाखू युक्त पदार्थांचे विक्री अथवा वितरण करणाऱ्या कोणालाही जबर दंडाची शिक्षा असून तशा प्रकारचे वर्तन करताना कोणी आढळल्यास त्याला योग्य ती शिक्षा केली जाऊ शकते तसेच दंड अथवा शिक्षेची वाट न पाहता आपण स्वयंशिस्तीने या अमली पदार्थांचे वाटप अथवा विक्री करण्यासाठी मज्जाव करावा व तरुण पिढीवर होणाऱ्या व्यसनाधीनते पासून त्यांना दूर ठेवण्यात समाजाने सहकार्य करावे. – प्रशांत आवारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक लोणावळा, ग्रामीण
अंमली पदार्थाचे सेवन हे स्वतःसह समाजाच्या व देशाच्या हिताचे नाही. युवकांनी अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम समजावून घेऊन परिसरातील समाजामध्येसुद्धा जनजागृती करावी. नशा ही जीवनाची दुर्दशा करते हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. भारताची पुढील पिढी सशक्त,सुदृढ होण्यासाठी शिक्षकांसोबत पालकांनी ही लक्ष देणे गरजेचे आहे.त्यासाठी मुलांवरती लहानपणी संस्कार होणे गरजेचे आहे. – लक्ष्मण भालेराव, संचालक, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये योग्य संस्काराची रुजवणूक झाल्यास त्यांच्यावर कोणतीही वाईट व्यसन करण्याची वेळ येणार नाही यासाठी योग्य व्यवस्थापन असणे गरजेचे आहे शाळेतील मुले अमली पदार्थांच्या आहारी जाऊ नयेत यासाठी त्याचे विपरीत परिणामाची जाणीव त्यांना या वयातच करून देणे गरजेचे आहे. – बाबासाहेब काळे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पावसाचा जोर वाढला, पुणे जिल्हा घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस, मावळात रात्रीपासून जोरदार पाऊस
– मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली, पोलिसांचे सपशेल दूर्लक्ष । Maval News
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहने सुसाट !! ‘आयटीएमएस’ प्रणालीद्वारे तब्बल साडेचारशे कोटींचे ई-चलन जारी