व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली ; एलईडी दिव्यांमुळे होताहेत अपघात

चारचाकी वाहन खरेदीनंतर आपले वाहने इतरांपेक्षा वेगळे दिसावे किंवा ते खास असावे असे वाटणाऱ्या नागरिकांकडून वाहन मॉडिफाय केले जाते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 13, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Action taken by Talegaon traffic police on vehicles with black glass

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात चारचाकी वाहने वापरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. परंतु चारचाकी वाहन खरेदीनंतर आपले वाहने इतरांपेक्षा वेगळे दिसावे किंवा ते खास असावे असे वाटणाऱ्या नागरिकांकडून वाहन मॉडिफाय केले जाते. अशावेळी वाहनांना काळ्या काचा लावणे, तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावणे असे प्रकार केले जातात. मावळात सध्या काळ्या काचा लावलेल्या आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढलेली दिसते.

Novel NIBR Ads

काळ्या काचा असणाऱ्या वाहनांतून गुन्हेगार देखील मोकाट फिरतात. त्यामुळे गुन्ह्यांत फायदेशीर ठरणाऱ्या अशा काळ्या काचाच्या वाहनांवर आणि चालक / मालकांवर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच पोलिसांचेही काळ्या काचा असलेल्या वाहनांकडे आणि फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या वाहनांकडे दूर्लक्ष होत असलेले दिसते.

आपले वाहन इतरांपेक्षा वेगळे आणि खास दिसावे यासाठी कार मालक काळ्या फिल्म लावून काचा काळ्या करणे, हेडलाइट्समध्ये एलईडी दिवे बसविणे, फॅन्सी नंबर प्लेट बनविणे असे उद्योग करतात. ह्या गोष्टी संबंधितास आनंद देऊन जात असतील, परंतु, ते इतरांसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या दिव्यांच्या विक्रीवर बंदी घालावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक, कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मावळ तालुक्यातील काही व्यक्ती एलईडी दिवे आपल्या वाहनांमध्ये बसवून रुबाबात मिरवत आहेत. मात्र, याच गाड्या रात्रीच्या वेळी समोर आल्यानंतर इतर वाहनचालकांचे डोळे यामुळे दीपत आहेत. या दिव्यांमुळे आपली वाहने एका बाजूला घेऊन थांबवावी लागत आहे. परिणामी, हेच एलईडी दिवे अपघाताचे निमंत्रण देणारे ठरत आहे.

काही जण चारचाकी गाडीच्या काचेला पूर्णपणे काळ्या फिल्म लावत आहेत. त्यामुळे काचांमागे गैरप्रकारांची शक्यता नाकारता येत नाही. काळ्या फिल्म लावण्यावर न्यायालयाने बंदी घातली असली, तरी नियम मोडून अथवा शासनाचे आदेश डावलून मावळात असे प्रकार सुरू आहेत. रस्त्यांवर व बाजारपेठांमध्ये काळ्या काचाची वाहने सरार्सपणे रुबाबात मिरवताना अनेक चालक मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

Novel NIBR Ads

जीवघेणे ठरणारे हे एलईडी दिवे वाहतूक पोलिसांनी बंद करायला हवेत. शासनाचे काही निर्बंध असले, तरीही या दिव्यांची सर्रासपणे विक्री सुरू आहे. विक्रेत्यांवर कारवाया झाल्या तर ही जीवघेणी फॅशन कमी होताना दिसेल.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल
– ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू
– मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती
– मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड 


dainik maval jahirat

Previous Post

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी

Next Post

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Rain

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.