Dainik Maval News : अजिवली – जवण ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संतोष भिकोले यांचे सोमवारी ( दि. ८ सप्टेंबर २०२५) रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली असून सर्वच क्षेत्रातून तीव्र शोक व्यक्त होत आहे.
भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असणारे संतोष भिकोले हे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. तसेच श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ८ ) पुणे दिशेने जात असताना संतोष भिकोले यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज (दि. ९) जवण क्रमांक तीन या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारे कार्यकर्ते म्हणून संतोष भिकोले यांची ओळख होती. तसेच त्यांच्यापाठी मोठा जनसंग्रह होता. त्यांच्या निधनाने मावळ तालुक्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha
– कौतुकास्पद ! डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या कडून लोणावळा येथे निर्माल्य संकलन अभियान । Lonavala News
– आदिवासी विकासाला गती देण्यासाठी ‘आदी कर्मयोगी’ अभियान ; जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा संपन्न । Pune News