व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

व्हिडिओ : ग्रामसभेतच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न ; मावळमधील कामशेत येथील गंभीर घटना । Kamshet News

वारंवार तक्रार करून देखील ग्रामपंचायतीकडून आपली समस्या न सोडविली गेल्याने हताश झालेल्या व्यक्तीने ग्रामसभेत अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 9, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, व्हिडिओ, शहर
Video Attempted self-immolation by pouring kerosene on body in Gram Sabha incident in Kamshet Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वारंवार तक्रार करून देखील ग्रामपंचायतीकडून आपली समस्या न सोडविली गेल्याने हताश झालेल्या व्यक्तीने ग्रामसभेत अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही गंभीर घटना सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) रोजी मावळ तालुक्यातील खडकाळा (कामशेत) ग्रामपंचायत येथे घडली. रामचंद्र धावडे असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र धावडे यांचे घर शेतात आहे. ते मागील सहा वर्षांपासून शेतात राहतात. त्यांच्या शेतात गावातील सांडपाणी येत आहे. हा प्रकार मागील चार वर्षांपासून सुरु आहे. पाऊस पडल्यानंतर सांडपाण्यात वाढ होऊन हे पाणी त्यांच्या घरात येते. गावातील सांडपाण्यासोबत शेतातील साप, विंचू, बेडूक असे प्राणी देखील घरात येत. मागील चार वर्षांपासून धावडे यांनी ग्रामपंचायतीकडे सांडपाणी इतर ठिकाणी वाळविण्याबाबत मागणी केली. मात्र त्यांना नेहमी उडवाउडवीची उत्तरे मिळाली.

सोमवारी खडकाळे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत सरपंच रुपेश गायकवाड आणि ग्रामस्थ रामचंद्र धावडे देखील उपस्थित होते. धावडे यांनी ग्रामसभेत आपला प्रश्न उपस्थित केला. ग्रामसेवक धनंजय देशमुख यांनी यासाठी निधी नसल्याचे सांगितले. यावेळी देखील नेहमीप्रमाणे त्यांची तक्रार ऐकून घेतली गेली नाही. त्यामुळे वैतागून त्यांनी भर ग्रामसभेत स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना अडवून त्यांच्या हातातील रॉकेलची बाटली आणि माचिस हिसकावून घेतली. त्यानंतर कामशेत पोलिसांना बोलावण्यात आले. रामचंद्र धावडे यांच्या जागेत जाऊन तात्काळ पाहणी करण्यात आली. त्यानंतर लगेच जेसीबीच्या साहाय्याने कामाला सुरुवात करण्यात आली. धावडे यांच्या शेतात येणाऱ्या सांडपाण्याच्या लाईन बुजवण्यात आल्या. आजवर निधी नसल्याचे कारण सांगणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाने या घटनेनंतर तात्काळ कार्यवाही केली. एकूणच ग्रामपंचायतीच्या ढीसाळ अन् बेजबाबदार कारभाराबद्दलही आता संताप व्यक्त होत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha
– कौतुकास्पद ! डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या कडून लोणावळा येथे निर्माल्य संकलन अभियान । Lonavala News
– आदिवासी विकासाला गती देण्यासाठी ‘आदी कर्मयोगी’ अभियान ; जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा संपन्न । Pune News


dainik maval jahirat

Previous Post

अजिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संतोष भिकोले यांचे आकस्मित निधन । Santosh Bhikole Passes Away

Next Post

सांगवी गावचे ग्रामदैवत श्री जाखमाता देवीची विधिवत पुनर्प्रतिष्ठापना । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sangvi village deity Shri Jakhamata Devi duly re-established Maval News

सांगवी गावचे ग्रामदैवत श्री जाखमाता देवीची विधिवत पुनर्प्रतिष्ठापना । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.