मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात घडला आहे. चेंबूरहून वेट अँड जॉय वॉटरपार्क येथे गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेववर अंडा पॉइंट (मॅजिक पॉइंट) जवळ अपघात झाला. बस उलटल्याने अपघाताची तीव्रता वाढली आहे. सदर ठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. ( Major Accident On Mumbai Pune ExpressWay )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार मयंक ट्यूटोरीयल चे हे सर्व विद्यार्थी होते. चेंबूरहून वेट अँड जॉय वॉटरपार्क येथे गेले होते. परतीच्या मार्गावर असताना विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात झाला. बसमध्ये एकूण 48 विद्यार्थी होते. जखमींना बचावदलाकडून तातडीने रुग्णालयात नेण्यात येत आहे. खोपोली, लोणावळा येथेही पेशंट नेण्यात येत असून बचावकार्य वेगाने सुरु आहे. अपघाताची तीव्रता पाहता काहींचा मृत्यू होण्याची भीती आहे.
अधिक वाचा –
– तैलबैल येथे क्लाईम्बिंग करताना खाली पडून ट्रेकर्सचा मृत्यू, शिवदुर्गच्या जवानांनी शोधला मृतदेह
– पुणे जिल्ह्यातील 500 स्वयंसेवकांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे, सर्व तालुक्यांमधून नावनोंदणी करण्याचे आवाहन