राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडून राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये आपत्ती मित्रांची निवड करून त्यांना प्रशिक्षण ( Disaster Management Training ) देण्याच्या योजनेंतर्गत पुणे ( Pune ) जिल्ह्यातून 500 स्वयंसेवकांसाठी 16 डिसेंबरपासून प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. ( Disaster Management Training Workshop Sudumbare Maval Pune District )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल सुदुंबरे, मावळ या ठिकाणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी विविध तालुक्यातून 500 आपत्ती मित्रांची निवड करावयाची आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये कार्य करण्यास इच्छुक असणारे युवक-युवतीं, माजी सैनिक, राष्ट्रीय सेवा योजना आणि एनसीसीचे विद्यार्थी, नेहरू युवा केंद्राचे युवक-युवती, होमगार्ड, पोलीस मित्र, वनमित्र, नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक तसेच विविध संस्थेचे युवक-युवती नाव नोंदणी करू शकतात.
प्रशिक्षणासाठी इच्छुक स्वयंसेवकाचे वय 18 वर्षे ते 40 वर्षापर्यंत असावे. प्रशिक्षणार्थी 12 दिवसांचे निवासी प्रशिक्षण पूर्ण करण्यास तयार असावा. प्रशिक्षणानंतर प्रशासनास आपत्कालीन प्रसंगी सहकार्य करण्यास तयारी असावी. आपत्ती मित्रांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येवून त्यांचा 5 लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविण्यात येणार आहे.
.@NDRFHQ च्या योजनेंतर्गत #पुणे जिल्ह्यातील ५०० आपत्ती मित्रांसाठी १६ डिसेंबरपासून प्रशिक्षणाचे आयोजन. युवक-युवतींनी तहसिलदार कार्यालयात नाव नोंदणी करावी.अधिक माहितीसाठी ०२०-२६१२३३७१ किंवा ९३७०९६००६१ या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) December 10, 2022
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 020-26123371 किंवा 9370960061 या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी संबंधित तहसिलदार कार्यालयात नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ( Disaster Management Training Workshop Sudumbare Maval Pune District )
अधिक वाचा –
– पिंपरी चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक – व्हिडिओ
– चालकाविना धावणारा ट्रक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचा थरार – व्हिडिओ
– वडगाव मावळ । खंडणी आणि दरोडा प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर