पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शुक्रवारी मोठा अनर्थ टळला. ब्रेक फेल झाल्याने ट्रक चालकाने घाबरून हँड ब्रेक मारत ट्रकमधून उडी मारली. पण जबरदस्त भार असलेला हा ट्रक उतारामुळे चालकाविना सुसाट वेगाने धावत होता, डिवायडरला धडकत होता. मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर अमृतांजन पुलाजवळ ही घटना घडली. अमृतांजन पुलापुढे गेल्यावर ट्रक थांबला अन सर्वांचा जीव भांड्यात पडला. सुदैवाने या ट्रकमुळे कोणत्याही गाड्यांचे नुकसान झाले नाही की, कुणी जखमी झाले नाही. मात्र, हा व्हिडिओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे. ( Accident Video Of Brake Failure Truck On Mumbai Pune Expressway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
View this post on Instagram
अधिक वाचा –
– पिंपरी चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक – व्हिडिओ
– ‘लोकांची भावना सोडून राष्ट्रवादीसोबत काम करावे लागले, पण हे कुणालाही मान्य नव्हते’ – खासदार श्रीरंग बारणे