चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा ( Balasahebanchi Shivsena Party ) पदाधिकारी नियुक्ती मेळावा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कामगार नेते इरफान सय्यद उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शहर जिल्हा पदाधिकारी आणि पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले. ( Balasahebanchi Shivsena Pimpri Chinchwad Maval MP Shrirang Barne )
‘बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विचार सर्वांपर्यंत पोचवण्याचे काम सुरू आहे. महापालिकेची आगामी निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढून जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मित्र पक्ष भाजपसह आमची महापालिकेत सत्ता येईल’, असा विश्वास यावेळी बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हणाले बारणे?
‘बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी पक्षवाढीसाठी जोमाने काम करतील. पक्षाचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन वाढवले जाईल. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. या निर्णयांचा तळागाळातील लोकांना लाभ मिळवून देण्याचे काम पक्षाचे पदाधिकारी करतील.’
‘सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत, आत्मविश्वासाने काम करावे, कोणावर टीका-टिप्पणी करू नका, त्यात वेळ घालवू नका. विधायक कामावर भर द्यावा. सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू ठेवून काम करावे. जे सोबत येतील. त्यांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. तिकडे राहिलेले लोकही इकडे येतील, एवढा आत्मविश्वास ठेवून काम करावे. यापूर्वी कोणतीही समिती, महामंडळावर संधी मिळाली नाही. पण, यापुढील काळात नक्कीच चांगले काम करण्याची संधी मिळेल. आपल्या हक्काचे सरकार आहे.’
हेही वाचा – बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभेचे पदाधिकारी जाहीर, पाहा यादी
मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ,पिपरी,चिंचवड विधानसभा पदाधिकारी नियुक्त्या व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा ॲटो कल्टर पिंपरी येथे आज@MPShrirangBarne यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. @CMOMaharashtra @mieknathshinde @DrSEShinde @Sanjaymore9048 @nareshmhaske pic.twitter.com/Fhc6IiZrGZ
— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) December 7, 2022
‘शिवसेनेने पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात संघर्ष केला. लोकसभा, विधानसभा निवडणूक भाजपसोबत युतीत लढतो. युती म्हणून लोकांनी एका भावनेने, विचाराने मतदान केले. पण, लोकांची भावना सोडून राष्ट्रवादीसोबत काम करावे लागले. पण, हे कोणालाही मान्य नव्हते. लोकांची भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवली. परंतु, दखल घेतली नाही. त्यामुळे उद्रेक झाला. जनतेची कामे करण्यासाठी ताकद मिळत नव्हती. पण, आपला कोणाविरोधात राग नाही, द्वेष नाही’, असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार तथा उपनेते श्रीरंग बारणे मेळाव्यात बोलताना म्हणाले. ( Balasahebanchi Shivsena Pimpri Chinchwad Maval MP Shrirang Barne )
अधिक वाचा –
– इंदोरीचे उपसरपंच ते मावळचे दोनवेळा आमदार; वाचा दिगंबर भेगडे यांचा राजकीय प्रवास । Digambar Bhegade Death
– मावळ ॲग्रोच्या वतीने सोमवारपासून अस्सल इंद्रायणी तांदूळ महोत्सवाचे आयोजन