अपघाताचा आणि मृत्यूचा मार्ग बनलेल्या तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावर ( Talegaon-Chakan National Highway ) या दिवाळीत एक अनोखे आंदोलन करण्यात आले. तळेगाव-चाकण मार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबत दिरंगाई होत असल्याने अपघातांची संख्या वाढलीये. या वाढत्या अपघातांच्या निषेधार्थ तळेगाव-चाकण महामार्ग कृती समिती कडून ( Talegaon-Chakan Highway Action Committee ) निषेधाची ‘खड्डे दिवाळी’ साजरी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी खड्डे बुजवून त्यावर दिव्यांची रांगोळी काढून खड्ड्यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Minister Nitin Gadkari ) आणि खासदार श्रीरंग बारणे ( MP Srirang Barane ) यांची नावे देऊन निषेध व्यक्त केला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे, उपाध्यक्ष दिलीप डोळस, सचिव अमित प्रभावळकर, प्रमोद दाभाडे, संजय चव्हाण, चेतन डोळस तसेच जागरूक वाचक कट्टा समूहाच्या सदस्य विद्या काशीद, भास्कर माळी, आश्विन काशीद आदी उपस्थित होते. ( Talegaon-Chakan National Highway Pothole Filling Movement Against Minister Nitin Gadkari MP Srirang Barane )
आंदोलकांनी तळेगाव-चाकण महामार्गावर माळवाडी ते इंदोरी दरम्यान घमेले, फावडे हातात घेऊन रस्त्यावरील मोठे खड्डे मातीने बुजवले. या बुजवलेल्या खड्ड्यांवर दिव्यांची आणि फुलांची रांगोळी काढून शेतकरी हॉटेलसमोरील धोकादायक खड्ड्याला खासदार श्रीरंग बारणे यांचे नाव दिले. तर इंदोरी बाह्यवळण रस्त्यावरील इंद्रायणी पुलाजवळील वळणावरील मोठ्या खड्ड्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देण्यात आले.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील लाखो भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! भातविक्री आणि किंमतीचे टेन्शन होणार दूर
– सहयोग फाउंडेशनकडून मावळमधील आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप I Diwali 2022