मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) पहिल्यांदाच विविध कार्यकारी विकास सोसायट्यांमार्फत भात उत्पादक शेतकऱ्यांमार्फत भात खरेदी करण्यात येणार आहे. तालुक्यातील सुमारे 55 विकास सोसायट्यांमार्फत तालुक्यात पहिल्यांदाच थेट शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. तब्बल दहा लाख पोती भात खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना भाताची गुणवत्ता पाहून एक रकमी पैसे दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक माऊली दाभाडे ( Mauli Dabhade ) यांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सोसायट्यांमार्फत भात खरेदी करण्याबाबत पवनानगर येथे नियोजन बैठक झाली. यावेळी माऊली दाभाडे यांच्यासह माऊली ठाकर, ज्ञानेश्वर आडकर, संभाजी शिंदे, बबनराव मोहोळ, वाघू मोहोळ, किसनराव वाळुंज, सुदाम काळे, रामजी काळे, सोनबा गोपाळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा – मावळमध्ये कृषी विभागाच्या प्रयत्नांना यश, नियोजनात्मक शेतीमुळे भातपिक जोमात, पावसाच्या तडाख्यापासूनही बचाव
मावळ तालुका हा भात पिकाचे आगार म्हणून ओळखला जातो. तालुक्यात सुमारे 13,500 हेक्टरवर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी इंद्रायणी वाणाची लागवड केली आहे. मावळ तालुक्यात पिकणारा इंद्रायणी तांदूळ खास चवीसाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र, दरवर्षी हंगामात बरेच व्यापारी बाजारभाव पाडून भात खरेदी करत असतात. तसेच शेतकऱ्यांनाही त्यांचे पैसे अनेकदा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांना भाताचे एकरकमी पैसे मिळावेत या हेतूने हा उपक्रम राबवला जाणार आहे. ( Buy Rice Paddy By Various Development Executive Societies Maval Taluka Mauli Dabhade )
अधिक वाचा –
–सहयोग फाउंडेशनकडून मावळमधील आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप I Diwali 2022
– वडगाव रेल्वे स्टेशनवर अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ! वर्णनावरुन ओळख पटल्यास संपर्क करण्याचे पोलिसांचे आवाहन