सहयोग फाउंडेशन यमुनानगर निगडी यांच्याकडून दरवर्षी दिवाळी फराळ वाटप करण्यात येतो. यंदाही फाउंडेशनकडून मावळ तालुक्यातील पिंपरी, मालेगाव येथील आदिवासी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
आदिवासी – वनवासी बांधवांसाठी त्यांची दिवाळी गोड व्हावी आणि सणांचे महत्त्व त्याचे कार्य समाजातील सर्व स्तरातून प्रकट व्हावे, यासाठी वनवासी-गिरीनिवासी बांधवांना सहयोग फाउंडेशन तर्फे फराळ वाटप करण्यात आले. यासाठी मावळ तालुक्यातील पिंपरी, मालेगाव यासारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना लाडू चिवडा पणत्या इत्यादीचे वाटप करण्यात आले. ( Sahayog Foundation Distribut Snacks To Tribal People Diwali 2022 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आश्रम शाळेतील मुख्याध्यापक भोर सर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात गायत्री मंत्राने करण्यात आली. ह.भ.प. जगताप महाराज यांनी धर्म आणि दिवाळी सण याचे महत्त्व सांगितले. ज्येष्ठ स्वयंसेवक श्री अण्णा आढी यांनी सहयोग फाउंडेशनची कार्यपद्धती आणि या उपक्रमाचा हेतू कथन केला. संदीप बोराडे सरांनी आभार मानले. उपस्थितांमध्ये ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सरपंच माननीय रोहिणी कोकाटे, उपसरपंच अंकिता गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते राजेश कोकाटे होते. यावेळी सर्व ग्रामस्थांना फराळ वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
सर्व फराळचे पदार्थ यमुनानगरवासीयांच्या सहभागातून संकलन केले. त्याबद्दल मदत करणाऱ्या सर्वं यमुनानगरवासीयांचे खूप खूप आभार. सहयोगच्यावतीने 20 प्रतिनिधी फराळ वाटपासाठी उपस्थित होते. आण्णा अढी, आप्पा कुलकर्णी, धनाजी शिंदे, आदित्य कुलकर्णी, विकास देशपांडे, दिनेश कुलकर्णी सर, अशोक वाळके पाटील, जगदीश साबळे, प्रकाश साकुरे यांनी उपक्रमाचे नियोजन केले.
अधिक वाचा –
– कै. ॲड. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सृजनालय येथे दिवाळीनिमित्त मुलींना फराळ वाटप
– वडगाव रेल्वे स्टेशनवर अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ! वर्णनावरुन ओळख पटल्यास संपर्क करण्याचे पोलिसांचे आवाहन