दिवाळी निमित्त कै. ॲड. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ तळेगांव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने अजित फाऊंडेशनच्या सृजनालय येथे मुलींना दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रकल्पप्रमुख रो. संतोषजी खाडंगे, रोटरी अध्यक्ष रो. विन्सेंटजी सालेर, रो. बाळासाहेब शिंदे, रो. मिलिंदजी शेलार, डॉ. युवराजजी बढे, पांडुरंग पोटे, विलास टकले, लक्ष्मण मखर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काही महिन्यांपूर्वी मावळमधील युवा वकील शलाका खांडगे यांचे दुःखद निधन झाले. शलाका यांचाया निधनामुळे खांडगे परिवाराला मोठा धक्का बसला. मात्र, वकिलीतून समाजसेवेचे ब्रीद घेतलेल्या शलाका यांच्या आकस्किमक निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या नावे चॅरिटेबल ट्र्स्टची स्थापना केली.
अधिक वाचा –
– लोणावळा-पुणे लोकल दुपारीही सुरु करा, खासदार बारणेंची मागणी I MP Shrirang Barne
– “राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न नाही, नेतृत्वावरील नाराजीमुळे तो पक्ष स्वतःहून बुडेल”