स्व. प्रशांतदादा जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि साई ग्रुप देहु यांच्या वतीने श्री क्षेत्र देहू येथे ‘आमदार चषक-फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. रविवारी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला, यास मावळचे आमदार सुनिल शेळके हे उपस्थित होते. या स्पर्धेत सचिनभाऊ भाडाळे प्रतिष्ठान वाघोली यांनी प्रथम क्रमांक, चंद्रकांत दाभाडे इलेव्हन इंदोरी यांनी द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक आदिश्री इलेव्हन पुणे या संघाने पटकावला. ( MLA Sunil Shelke Birthday Cricket Tournament at Dehu Gaon )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
स्पर्धेच्या बक्षिस वाटप समारंभप्रसंगी आमदार सुनिल शेळके, सुनिल काळोखे, बाळासाहेब काळोखे, सतीश काळोखे, प्रितम वारघडे, प्रकाश हगवणे, नंदूभाऊ काळोखे, नगरसेवक प्रवीण काळोखे, योगेश काळोखे, योगेश परंडवाल, विवेक काळोखे, सतीश काळोखे, अजय हगवणे, शांताराम शेवकर, धनंजय सावंत, योगेश मोरे, जयवंत घारे, सोमनाथ चव्हाण, उमेश हगवणे, माणिक जाधव, सागर काळोखे, सागर भसे, प्रशांत हगवणे, अविनाश भसे, नगरसेविका प्रियंका मोरे, पुजा काळोखे, पूजा दिवटे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा रेश्मा मोरे आदी मान्यवर, आजी-माजी पदाधिकारी तसेच आमदार सुनिलआण्णा शेळके युवा मंचचे सर्व सहकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– कै. ॲड. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सृजनालय येथे दिवाळीनिमित्त मुलींना फराळ वाटप
–लोणावळा-पुणे लोकल दुपारीही सुरु करा, खासदार बारणेंची मागणी I MP Shrirang Barne