मावळ लोकसभा ( Maval Loksabha ) मतदारसंघात रेल्वे विभागाची अनेक कामे चालू आहेत. मात्र, शेलारवाडी, वडगाव, कामशेत, मळवली येथील रेल्वेची काम अतिशय संथगतीने सुरु आहेत. रेल्वे अंडरपास, उड्डाणपूलांच्या कामाला गती देऊन कामे लवकर पूर्ण करावीत. तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकबाबत रेल्वेने पुढील कार्यवाही तत्काळ सुरु करावी. पुणे-लोणावळा ( Pune To Lonavla ) दरम्यान दुपारी 1 ते 2 या वेळेत ही लोकल सेवा ( Local Train Service ) सुरु करावी. लोकलला थांबे द्यावेत. गाड्या वेळेवर सोडाव्यात’, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे ( MP Shrirang Appa Barne ) यांनी मध्य रेल्वे विभागाच्या बैठकीत केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मध्य रेल्वे विभागाची बैठक पुणे विभागीय कार्यालयात झाली. या बैठकीस खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह पुणे, सोलापूर विभागातील खासदार, मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, पुणे विभागीय अधिकारी रेणू शर्मा आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मावळ लोकसभा मतदार संघातील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. ( MP Srirang Barane Said Pune Lonavala Local Train Service Should Start Even In Afternoon )
हेही वाचा – “मोदी सरकारचा ‘ रोजगार मेळा ’ म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरचा केवळ एक इव्हेंट !”
‘लोणावळा, भागरवाडी, कामशेत, वडवळे, जांभूळ, वडगाव, शेलारवाडी येथील एफओबी, आरओएफच्या कामांची माहिती घेण्यात आली. आकुर्डी आणि चिंचवड स्टेशनवर लिफ्ट बसविण्यात यावी. आकुर्डी आणि चिंचवड रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण व आधुनिकरण करावे. चिंचवडही श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांची पुण्यभूमी आणि क्रांतिकारक चापेकर बंधूंची भूमी आहे. मोरया गोसावी, चापेकर बंधूंची माहिती प्रवाशांना द्यावी. वडगाव, कामशेत, शेलारवाडी, जांभुळ, वडवळे, नायगाव या ठिकाणी चालू असलेले अंडरपासची कामे तात्काळ पूर्ण करावीत. वडगाव केशवनगर येथील लाईन शिफ्टिंगचे काम पूर्ण करावे. देहूरोड येथील पूलाचे काम पूर्ण करावे. सह्याद्री व सिंहगड एक्सप्रेसला पूर्वी प्रमाणे दोन डबे जोडण्यात यावेत’, असे खासदार बारणे म्हणाले. ( MP Shrirang Barne Meeting With Railway Officials )
अधिक वाचा –
– मनपा प्रशासन, पोलीस, व्यापारी, नागरिक यांनी सामंजस्याने काम करावे; खासदार श्रीरंग बारणेंचे आवाहन
–आमचं ठरलंय..! खासदार बारणेंनी सांगितली मावळ लोकसभेची रणनिती; कुठल्या पक्षातून, कुठल्या चिन्हावर सर्वकाही फिक्स