केंद्रातील मोदी सरकार 75 हजार जागांची नियुक्त पत्रे इच्छुक उमेदवारांना देत असल्याचा मोठा गाजावाजा करत आहे. परंतु यातील अनेक जागांच्या परीक्षा दीड दोन वर्षांपूर्वीच झालेल्या असून नियुत्या मात्र प्रलंबित ठेवण्यात आल्या होत्या. आता हिमाचल प्रदेश, गुजरात व इतर निवडणुका होत असल्याने भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर तरुणांची आठवण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाने रोजगार मेळाव्याचा एक इव्हेंट केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, मेगा इव्हेंट करण्यात नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचा कोणी हात धरू शकत नाही. स्टाफ सिलेक्शन, रेल्वे भरती बोर्ड, पोस्ट यासह विविध बोर्डाच्या परीक्षा होऊन दीड वर्ष झाली पण विविध परीक्षा बोर्डानी घेतलेल्या परीक्षांचे निकाल थांबवून पंतप्रधानांना दिवाळीचा इव्हेंट करता यावा म्हणून ही भरती थांबवली. आता हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत तर गुजरातच्या निवडणुकाही लवकरच होत आहेत. या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आता नियुक्तीपत्र देण्याचा घाट घातला आहे, अशी टीका लोंढेंनी केली. ( BJP Prime Minister Narendra Modi Job fair Congress Atul Londhe Criticism )
2018 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी 72 हजार जागा भरण्यासाठी मेघा भरतीचे आश्वासन दिले होते प्रत्यक्षात 72 जागा ही भरल्या नाहीत.
विविध परीक्षा बोर्डानी घेतलेल्या परीक्षांचे निकाल थांबवून पंतप्रधानांना दिवाळीचा इव्हेंट करता यावा म्हणून भरती थांबवली.— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)???????? (@atullondhe) October 22, 2022
श्रम पोर्टलवर 22 कोटी तरुणांनी नोकरी व रोजगारासाठी नोंदणी केली आहे त्यातील फक्त 7 लाख लोकांना नोकरी भेटली आहे. CMIE प्रमाणे 45 कोटी लोकांनी नोकरीची अपेक्षा सोडली आहे
मोदी जी फडणवीस जी उत्तर द्या— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)???????? (@atullondhe) October 22, 2022
तसेच, श्रम पोर्टलवर 22 कोटी तरुणांनी नोकरी व रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यातील फक्त 7 लाख लोकांना नोकरी मिळाली आहे. CMIE च्या मते 45 कोटी लोकांनी नोकरीची अपेक्षा सोडली आहे. तर केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या 25 लाख जागा रिक्त आहेत. उपलब्ध नोकऱ्या, नोकरी मागणाऱ्यांची संख्या व बेरोजगारीचा उच्चांक पाहता 75 हजार नोकऱ्या म्हणजे ‘उंट के मुंह में जिरा’ असेच म्हणावे लागले, असा घणाघात लोंढेंनी केला.
Addressing the Rozgar Mela where appointment letters are being handed over to the newly inducted appointees. https://t.co/LFD3jHYNIn
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2022
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री असताना 72 हजार पदांची मेगा भरती करण्याची घोषणा केली होती पण प्रत्यक्षात ते 72 लोकांनाही नोकऱ्या देऊ शकले नाहीत. फडणवीसांनी नोकर भरती केली नाही तर वेगळीच भरती केली. दुसऱ्या पक्षातील आमदार, खासदारांची भाजपामध्ये भरती केली. मोदी आणि फडणवीस म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी’ असे लोंढे म्हणाले.
अधिक वाचा –
– एक दिवाळी अशीही, कौतुकास्पद उपक्रमातून समाजापुढे नवा आदर्श, पाहा व्हिडिओ
– भडकाऊ भाषण करणाऱ्या आमदार भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल करा, लोणावळा भाजपा अल्पसंख्यांक सेलची मागणी
– मावळसह संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या नियोजित विकास कामांबाबत ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न