देहूगाव ( Dehu Gaon ) येथे कमी दरात प्लॉट देण्याच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक ( Fraud of old man ) केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रघुनाथ भिकोबा कुंभार (रा. अभंगनगरी सोसायटी, गाथा मंदिर रोड, देहूगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. अनिल जनार्दन सरोदे (रा. पंचशीलनगर, धनकवडी) आणि भारत नरहरी पवार (रा. इंदिरानगर, धनकवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी रघुनाथ कुंभार यांना माळीनगर भागात कमी दरात प्लॉट देतो असे सांगत व्यवहार पुर्ण होण्यापूर्वीच 6 लाख रुपये उकळले. त्यानंतर फिर्यादीने प्लॉटबाबत आणि पैशांबाबत विचारणा केली असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. तसेच फिर्यादीने पैशांबाबत आरोपींच्या राहत्या घरी जाऊन विचारणा केली असता फिर्यादीसह त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा फिर्यादीस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ( Fraud With Senior Citizen At Dehu Gaon )
अधिक वाचा –
– श्रीक्षेत्र देहू येथील अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्नेहालय संस्थेला 500 साड्या, लहान मुलांसाठी कपडे आणि 25 हजारांची देणगी
– पवनानगर येथे ‘एक हाथ मदतीचा, मावळच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ उपक्रमातून तब्बल 100 मुलांना शालेय साहित्यासह पोषण कीटचे वाटप