‘एक हाथ मदतीचा, मावळच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ या संकल्पनेखाली आज (शुक्रवार, 21 ऑक्टोबर) रोजी पवनानगर येथे शांताई मंगल कार्यालयात मदत कीट वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अंगणवाडीच्या 100 मुलांना हे मदत कीट देण्यात आले. काले – पवनानगर ग्रामपंचायतीकडून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. मा उपसरपंच अमित कुंभार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सुरु करण्यात आला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुलांची शारीरिक तसेच बौद्धिक वाढ चांगली व्हावी, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. 100 मुलांचे पालक तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस यावेळी कार्यक्राला उपस्थित होते. तसेच उद्योजक मनोज सेनानी, भारत ठाकूर, विजय तिकोने, डॉ संजय चौधरी, मुकुंद ठाकर, सचिन कालेकर, शांताराम भोते यांनी विशेष आर्थिक सहकार्य केले. ( Pavananagar A helping hand initiative Distribution of relief insects to 100 students )
शिवसेना तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, राष्टवादी युवक जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकुले, भारत ठाकूर, महेश केदारी, डॉ संजय चौधरी, मुकुंद ठाकर, सरपंच खंडू कालेकर, उपसरपंच आशा कालेकर, ग्रामसेवक रविंद्र वाडेकर, छाया कालेकर, उत्तम चव्हाण, रमेश कालेकर, शक्ती जव्हेरी, विकास कालेकर, किशोर शिर्के, अतुल केंडे, संतोष कालेकर, श्याम सुतार, एकनाथ जांभूळकर, अशोक निकम, अक्षय येलवंडे, तेजश्री शेंडे, फातिमा तांबोळी, शोभा शिर्के, माधुरी जव्हेरी, लिलाबाई भालेराव, मंगल कालेकर, अनिता जगताप, अनुजा यादव आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमचे सुत्रसंचालन तेजश्री शेंडे यांनी तर प्रस्ताविक अमित कुंभार यांनी केले, तर विकास कालेकर यांनी आभार मानले.
View this post on Instagram
अधिक वाचा –
– मावळसह संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या नियोजित विकास कामांबाबत ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न
– पीएमपीएमएल बस शिळींब गावापर्यंत येणार? विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय टळणार? महाव्यवस्थापकांना ग्रामस्थांचे निवेदन