कामशेत शहरातील अतुल बाळासाहेब मेदगे यांचे आज (शुक्रवार, 21 ऑक्टोबर) रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे. बाळासाहेब मेदगे यांचे ते तृतीय चिरंजीव होते. ( Atul Medge Died in an accident Kamshet )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अतुल यांची उत्कृष्ठ क्रिकेट खेळणारा खेळाडू म्हणून पंचक्रोशीत ओळख होती. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दुपारी साडतीन वाजता भैरवनाथ मंदिर जवळील स्मशानभूमी गावठाण कामशेत येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अतुल मेदगे यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! कामशेतजवळ भीषण अपघात, मंत्री संदीपान भुमरेंच्या बंधूचा मृत्यू I Kamshet Accident
– बसुबारस 2022 : दिवाळी सणाचा पहिला दिवस, मावळमधील या नेते, प्रतिनिधींनी दिल्या वसुबारसच्या शुभेच्छा