पुणे जिल्हा ( Pune District ) तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) शहराच्या नियोजित विकासाबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या समवेत वर्षा ( Varsha Bungalow ) या शासकीय निवासस्थानी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी महायुतीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीला खासदार श्रीरंग आप्पा बारणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी मंत्री विजयबापू शिवतरे, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, आमदार राहूल कुल, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेशबापू कोंडे, गणेश बिडकर आदी महत्वाचे नेते, प्रतिनिधी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे लढवणार असल्याचे जवळपास फिक्स झाल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील वर्षावर झालेल्या या बैठकीतून तसे स्पष्ट संकेत देण्यात आले आहे. स्थानिक निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापुढे दरमहा पुणे जिल्ह्याची आढावा बैठक घेणार आहेत.
राज्य सरकारच्या विविध योजना, निधी महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मिळावा त्यादृष्टीने सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे बैठकीत सांगण्यात आले. पुणे जिल्ह्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत ज्या नेत्यांनी हजेरी लावली, त्यांच्यात ‘राष्ट्रवादी पर्यायाने पवार विरोधक’ हे समान सूत्र असल्याचे दिसून आले. ( special meeting for Pune District Planning development held by Chief Minister Eknath Shinde at Varsha Bungalow )
अधिक वाचा –
– पुण्यश्री योजनेंतर्गत मावळमधील वडेश्वर येथील बचत गटाच्या विक्री केंद्राचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन
– ऐतिहासिक वारसा लाभलेला कुसुरघाट रस्ता लवकर व्हावा, स्थानिक ग्रामस्थांसह भाजपा विद्यार्थी आघाडीचे चंद्रकांत पाटलांना निवेदन, वाचा माहिती
– मोठी बातमी ! काँग्रेसला मिळाला नवा ‘हायकमांड’, खरगे-थरूर यांच्यातील अध्यक्षपदाच्या लढतीत ‘यांनी’ मारली बाजी