मळवली ( Malavli ) ते लोणावळा ( Lonavla ) स्थानकादरम्यान मळवली रेल्वे स्थानक जवळ गुरुवारी (दि 20 ऑक्टोबर) रोजी पहाटेच्या सुमारास विशाखापट्टणम एक्सप्रेसच्या धडकेत एका अज्ञात महिलेचा मृत्यू झाला. पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे वय अंदाजे 28 वर्षे असून आहे. निमगोरा वर्ण, कपाळ मोठे, नाक सरळ, डोक्याचे केस लांब काळे असे मृत महिलेचे वर्णन आहे. सदर महिलेच्या अंगात भगव्या रंगाची सलवार परिधान केलेली आहे. मृत महिलेच्या उजव्या हाताच्या दंडावर मराठीत संतोष, पूजा असे तर पोटरीवर इंग्रजीत ‘पी’ व पंजावर ‘व्हीडीपी’ ही अक्षरे गोंदली आहेत. ( Malavli Railway Station Woman Dead After Hit By Visakhapatnam Express )
मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून मृताविषयी माहिती असल्यास संबंधितांनी लोणावळा रेल्वे दूरक्षेत्र पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शिवाजी सावंत करत आहेत.
अधिक वाचा –
– लोणावळ्यात विवाहितेचा छळ; पती, सासूसह 5 जणांवर गंभीर आरोप, गुन्हा दाखल I Lonavla City Crime
– सावधान! पार्किंगमध्येही गाड्या सुरक्षित नाही? वलवणमध्ये सव्वाचार तासात दुचाकी चोरी, वाचा संपूर्ण घटनाक्रम