वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी भारतीय जनता पार्टीचे शंकर नंदकुमार भोंडवे यांची निवड झाली आहे. शुक्रवार रोजी भोंडवे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीनंतर शहरातून त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. ( BJP Shankar Bhondve Appointed as Accepted corporator of Vadgaon Nagar Panchayat )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भाजपचे यापूर्वीचे स्वीकृत नगरसेवक श्रीधर चव्हाण यांनी पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी शंकर भोंडवे यांचा एकमेव अर्ज जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांकडे दाखल झाला होता. छाननीत अर्ज वैध ठरला. शुक्रवारी नगरपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी स्वीकृत नगरसेवकपदी भोंडवे यांची निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, भाजपचे गटनेते दिनेश ढोरे, नगरसेवक किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रवीण चव्हाण, सुनिता भिलारे, दीपाली मोरे आदी उपस्थित होते.
भोंडवे यांच्या निवडीनंतर भाजपचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शहराध्यक्ष अनंता कुडे, सुधाकर ढोरे, भाऊ ढोरे, रवींद्र काकडे, भूषण मुथा, प्रसाद पिंगळे, शामराव ढोरे, महिलाध्यक्षा धनश्री भोंडवे, युवक अध्यक्ष विनायक भेगडे, किरण भिलारे आदींच्या उपस्थितीत भोंडवे यांचा सत्कार करून मिरवणूक काढण्यात आली.
अधिक वाचा –
– पवनानगर येथे ‘एक हाथ मदतीचा, मावळच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ उपक्रमातून तब्बल 100 मुलांना शालेय साहित्यासह पोषण कीटचे वाटप
– मावळसह संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या नियोजित विकास कामांबाबत ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न