कामशेत शहरातील फटाके विक्री दुकानात हिंदू देवदेवतांचे फोटो असलेले फटाके विक्रीसाठी ठेऊ नये, यासाठी हिंदू समिती कामशेत वतीने प्रत्येक फटाके विक्री करत असलेल्या दुकानदार मालकास आवाहन करत विनंती पत्र देण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
देशातील मोठी फटाके विक्री कंपनी अनिल फायर वर्क्स आणि इतर फटाके उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना लवकरच लेखी निवेदन देण्यात येणार असून तरी कोणत्याही फटाका स्टॅालवर हिंदू देवदेवतांचे फोटो असलेले फटाके विक्रीसाठी ठेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. लक्ष्मी मातेचे फोटो असलेले फटाके फोडल्यानंतर आपल्या हिंदू देव देवतांच्या फोटोचे तुकडे तुकडे होतात आणि नंतर पायदळी तुडवले जातात, एक प्रकारे आपल्या देवदेवतांची होणारी ही अवहेलना आहे.
हिंदू समिती कामशेतकडून स्थानिक दुकानदारांना विनंती पत्र देण्यात आल्यानंतर काही दुकानदार मालकांनी पत्र मिळताच दिलेली ऑर्डर तात्काळ रद्द केली. ( Hindu Samiti Kamshet Appeal Not To Sell Firecrackers With Pictures Of Deities )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे शंकर भोंडवे, निवडीनंतर जंगी मिरवणूक
– कामशेतमधील अतुल बाळासाहेब मेदगे यांचे अपघाती निधन, उत्कृष्ठ क्रिकेटपटू हरपला