केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) यांच्याबद्दल, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल अवमानकारक भाषा वापरणारे आणि भडकाऊ भाषण करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( shivsena uddhav balasaheb thackeray ) गटाचे आमदार भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लोणावळा पोलिसांकडे ( Lonavla City Police ) करण्यात आली आहे. लोणावळा शहर भाजपा ( Lonavla Bjp ) अल्पसंख्यांक सेलच्या वतीने शहर पोलिसांकडे तक्रार अर्जाद्वारे ही मागणी करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भडकावू भाषण करून सामाजिक भावना दुखावल्याबद्दल लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी अर्ज देण्यात आला. या वेळी लोणावळा शहराच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष पुजारी, मावळ तालुका अल्पसंख्यांक ( BJP Minority Cell ) अध्यक्ष शौकत शेख , माजी नगरसेवक लालित सिसोदिया, मावळ तालुका चित्रपट अध्यक्ष सागर बेलुरे, भाजप युवा नेता अभय पारेख, खंडाळा अल्पसंख्य अध्यक्ष साजिद भाई बेपारी, सचिन शिंदे, शारुख शेख, कादिर मुगल, फरीद बेपारी, आशीष गुप्ता, सोहन मातेरे, रिजवान खान, दीपक कानोजिया आदी यावेळी उपस्थित होते. ( Lonavala BJP Demand File Case Against Shiv Sena MLA Bhaskar Jadhav )
अधिक वाचा –
– हिंदू देवदेवतांचे फोटो असलेले फटाके विक्रीसाठी ठेऊ नये, हिंदू समिती कामशेतचे विक्रेत्यांना आवाहन
– भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने तळेगावात दिव्यांग बांधवांना स्वावलंबन युडीआयडी कार्डचे वाटप