पक्की अनुज्ञप्ती ( लायसन्स ) मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे ( RTO Pimpri Chinchwad ) नोव्हेंबर 2022 मध्ये खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीच्या ( Permanent Driving Licence ) चाचणीसाठी 2 आणि 3 नोव्हेंबर रोजी खेड, 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी मंचर, 14 आणि 16 नोव्हेंबर रोजी जुन्नर, 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी वडगाव मावळ आणि 28 नोव्हेंबर रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी 31 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता कोटा उपलब्ध होणार आहे. ( RTO Pimpri Chinchwad Camp For Permanent Driving Licence )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिवाळी सणानिमित्त वाहन नोंदणीसाठी सुट्टीच्या दिवशी परिवहन कार्यालय सुरू :
दिवाळी सणानिमित्त राज्यात मोठ्या प्रमाणात नवीन वाहनांची खरेदी होत असते. या पार्श्वभूमीवर नवीन वाहनांची नोंदणी करून जनतेला वाहनांचा ताबा मिळावा तसेच शासकीय महसूल जमा व्हावा या उद्देशाने राज्य शासनाच्या आदेशानुसार शनिवार 22 ऑक्टोबर आणि रविवार 23 ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.
अधिक वाचा –
– ऐतिहासिक वारसा लाभलेला कुसुरघाट रस्ता लवकर व्हावा, स्थानिक ग्रामस्थांसह भाजपा विद्यार्थी आघाडीचे चंद्रकांत पाटलांना निवेदन, वाचा माहिती
–पीएमपीएमएल बस शिळींब गावापर्यंत येणार? विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय टळणार? महाव्यवस्थापकांना ग्रामस्थांचे निवेदन