दिवाळीमुळे पिंपरी कॅम्प व परिसरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतूक समस्याने उग्ररूप धारण केले आहे. या भागातील वाहतूक समस्या, अतिक्रमण याबाबत मनपा प्रशासन, पोलीस, व्यापारी, नागरिक यांनी सामंजस्याने काम करावे. व्यापाऱ्यांना, फेरीवाले व नागरिकांना त्रास होईल, अशी भूमिका पोलीस प्रशासनाने व मनपा प्रशासनाने घेऊ नये तसेच पिंपरी कॅम्प मधील सिंधी बांधवांना सनद देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
पिंपरी कॅम्प व परिसरातील व्यापाऱ्यांची संघटना असणाऱ्या पिंपरी मर्चंट फेडरेशनच्या ( Pimpri Merchants Federation ) वतीने मंगळवारी खासदार श्रीरंग बारणे ( MP Srirang Barane ) यांच्या उपस्थितीत पिंपरी मधील बी. टी. आडवाणी धर्मशाळा ( B T Advani Dharamshala ) येथे आयोजित केलेल्या बैठकीत खासदार बारणे बोलत होते. यावेळी पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी, माजी उपमहापौर डब्बू आसवानी, व्यापारी प्रतिनिधी हरेश आसवानी, महेश मोटवानी, मनपा अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पोलीस उपायुक्त मंचक ईप्पर, आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, भूमी जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, अर्जुन पवार, फेरीवाला संघटनेचे बाबा कांबळे आणि पिंपरी कॅम्प मधील बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते. ( Review Meeting By Pimpri Merchant Federation In Presence Of MP Srirang Appa Barane )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी खासदार बारणे यांनी सांगितले की, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे व्यापारी पेठा बंद होत्या. यावर्षी दिवाळी पूर्व खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन, नागरिक, व्यापारी, पोलीस यांनी एकत्रितपणे काम करावे. सर्वांनी नियमांचे पालन करावे. पोलीस प्रशासन व मनपा प्रशासनाने व्यक्तिगत कारवाई करू नये. वाहतूक समस्या विषयी, कॉपीराईट, अतिक्रमण, पार्किंग व्यवस्था, प्लास्टिक बंदी विषयी ज्या समस्या आहेत. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे शहराच्या विकासाबाबत व विकास आराखड्याबाबत बाबत सकारात्मक आहेत. शहर वाढत आहे तसे व्यापाऱ्यांची संख्या वाढत आहे. पिंपरी कॅम्प परिसरात असलेल्या पार्किंग जागेत नागरिकांनी वाहने पार्क करावीत. सर्वांनी शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन खासदार बारणे यांनी यावेळी केले.
यावेळी पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी मागणी केली की, पिंपरी कॅम्प परिसर दाट लोकवस्तीचा परिसर झाला आहे. हा भाग गावठाण म्हणून घोषित करावा. बाजारपेठ मध्ये पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावे. पोलीस व मनपा प्रशासनाने फुटपाथ वरील अतिक्रमण काढून घ्यावे. दुकानांसमोर पथारी वाले आणि फेरीवाले यांचे अतिक्रमण वाढत असून ते व्यापाऱ्यांवर दादागिरी करत आहेत. याबाबत पोलिसांनी लक्ष घालावे. व्यापाऱ्यांना चौकशीच्या नावाखाली त्रास देऊ नये. कॉपीराईटच्या नावाखाली धाडी टाकून व्यापाऱ्यांना त्रास दिला जात आहे. हे ताबडतोब थांबले पाहिजे. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, पोलीस उपायुक्त मंचक ईप्पर, फेरीवाल्यांचे नेते बाबा कांबळे यांनी देखील मार्गदर्शन केले. ( Review Meeting By Pimpri Merchant Federation In Presence Of MP Srirang Appa Barane )
अधिक वाचा –
आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त 43 शाळांना वॉटर प्युरिफायर भेट, तर 400 महिलांना साडी आणि मिठाई वाटप
‘उठा उठा दिवाळी आली… किल्ले बनवायची वेळ झाली’, मावळमधील कुंभार समाजाकडून मातीचे सैनिक बनवायची लगबग