देहुरोड येथे जुण्या मुंबई पुणे महामार्गावर एका दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला आहे. शुक्रवार (21 ऑक्टोबर) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. मुंबई-पुणे हायवेवर देहू कमानीजवळ सदर अपघात झाला. स्वतः दुचाकीस्वाराचा अतिवेग हाच त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अनिकेत डोळस (वय 28 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मृत गौतम पवार (वय 23 वर्षे रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 279, 304, 338, मोटर व्हेईकल कायदा कलम 119/177, 184 अन्वये देहुरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला. ( Dehu Road Bike Accident Two Wheeler Driver
Death )
शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाच्या सुमारास देहू कमानी जवळ मुंबई पुणे हायवे वर जुन्या रोडवर हा अपघात. यात आरोपी (मृत गौतम पवार) याने त्याच्या ताब्यातील टू व्हीलर भरधाव वेगाने चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरला होता, असे फिर्यादीत नमूद आहे.
अधिक वाचा –
– धक्कादायक ! पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, एका प्रवाशाचा मृत्यू
– टाकवे बु. गावात होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न, महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आमदार शेळकेंची सपत्नीक उपस्थिती