मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) टाकवे बुद्रुक ( Takwe budruk Village ) येथे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांच्या वाढदिवसाचे ( Birthday ) औचित्य साधून ‘सौ-भाग्यवती मावळ 2022’ अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रमाचे ( Home Minister Competition ) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावातील आणि परिसरातील महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला. तसेच आमदार सुनिल शेळके यांनीही कार्यक्रमाला सपत्नीक उपस्थिती लावली होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
समस्त ग्रामस्थ टाकवे बुद्रूक, मा सरपंच भूषण असवले, शिवाजी असवले, अनिल मालपोटे आणि सर्व सहकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुजा काळभोर यांनी विविध खेळांच्या माध्यमातून सर्व महिलांमध्ये चैतन्य निर्माण करुन वातावरण आनंदीमय केले. ( Home Minister Competition at Takwe budruk Village On Occasion of MLA Sunil Shelke Birthday )
महिला-भगिनी कौटुंबिक जबाबदारी नेहमीच सक्षमपणे पार पाडत असतात. ग्रामीण भागातील दररोजच्या कामाव्यतिरिक्त थोडा विरंगुळा मिळावा, यासाठी असे मनोरंजनात्मक कार्यक्रम झाले पाहिजेत. अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण खेळीमेळीत एकत्र येत असतो, असे मत यावेळी आमदार शेळकेंनी व्यक्त केले.
अधिक वाचा –
– “राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न नाही, नेतृत्वावरील नाराजीमुळे तो पक्ष स्वतःहून बुडेल”
– “मोदी सरकारचा ‘ रोजगार मेळा ’ म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरचा केवळ एक इव्हेंट !”