पुण्याहून दानापूरला जाणाऱ्या रेल्वेमध्ये चढताना प्रवाशांच्या चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवार (22 ऑक्टोबर) रोजी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. सध्या दिवाळीनिमित्त पुण्यातून बाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. शनिवारीही गाडी फलाटावर आल्यावर प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी डब्यात चढताना एकजण खाली पडला, त्यानंतर गर्दीत त्याला तुडवले गेले आणि तो गंभीर जखमी झाला, अशी माहिती समोर येत आहे. ( Stampede Among Passengers At Pune Railway Station One Died )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर प्रवाशाला रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवानांनी तात्काळ उपचारासाठी लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बोधा मांझे असे या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. हा प्रवाशी मूळचा बिहार येथील पाटणा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तो शनिवारी पुणे-दानापूर एक्सप्रेसने घरी जण्यासाठी निघाला होता. दरम्यान चेंगराचेंगरीची ही घटना नक्की कशामुळे घडली, याचा पोलिस तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– “मोदी सरकारचा ‘ रोजगार मेळा ’ म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरचा केवळ एक इव्हेंट !”
– एक दिवाळी अशीही, कौतुकास्पद उपक्रमातून समाजापुढे नवा आदर्श, पाहा व्हिडिओ