मावळ तालुक्यातील वडगाव रेल्वे स्टेशनवर अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. रविवार (दिनांक 23 ऑक्टोबर) रोजी दुपारी 12.30 वाजण्यापूर्वी वडगाव रेल्वे स्टेशन येथे एका अनोळखी पुरूषाचा (वय अंदाजे 30 वर्ष) मृतदेह आढळला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. ( Unidentified Body found Near Vadgaon Maval Railway Station )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मृतदेहाचे वर्णन –
पुरुष – अंदाजे वय 30, उंची 5′.4”, रंगाने गोरा, अंगाने सड पातळ, नाक सरळ, डोक्याची केस काळे मध्यम वाढलेले, दाढी मिशी काळी बारीक, अंगामध्ये फिकट निळसर रंगाचा त्यावर काळा ठिपक्याचा हाफ शर्ट, शर्टाच्या कॉलरवर इंग्रजीमध्ये टायझर, कोरे सिलेक्शन असे लिहिलेले लेबल आहे. काळ्या रंगाचा बर्मुडा, पायात स्पार्कस कंपनीचे सॅंडल असे मृतदेहाचे वर्णन आहे.
कोणत्यातरी धावत्या रेल्वे गाडीखाली सापडून सदर पुरुष जबर जखमी होऊन गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच सदर मृत व्यक्तीच्या वारसाबाबत उपयुक्त माहिती मिळाल्यास पोलीस हवालदार वसंत कुटे मोबाईल नंबर 9923385898 तळेगाव रेल्वे पोलिस यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक वाचा –
– लोणावळा-पुणे लोकल दुपारीही सुरु करा, खासदार बारणेंची मागणी I MP Shrirang Barne
– धक्कादायक ! पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, एका प्रवाशाचा मृत्यू