वडगाव मावळ । आईस्क्रीम दुकानदाराला खंडणी मागितल्याप्रकरणी आणि खंडणी न दिल्याने मालकाला व कामगारांना मारहाण करून दुकानात दरोडा टाकणाऱ्या आरोपीला वडगाव मावळ येथील सत्र न्यायाधीश व्ही.डी.निंबाळकर यांनी जामीन मंजुर केला आहे. ( Vadgaon Maval Court Grants Bail To Accused In Extortion And Robbery Case )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जय उर्फ किटक प्रविण भालेराव असे त्याचे नाव आहे. त्याने अॅड. सुरज संजय शिंदे यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. गुन्हा घडल्यानंतर 20 तासांच्या विलंबाने फिर्यादीवर गुन्हा दाखल केला आहे, आरोपीला फक्त टोपन नावाच्या आधारे आणि इतर आरोपींच्या पोलिस कोठडीतील माहितीशिवाय त्याच्याविरुद्ध कोणताही सबळ पुरावा नाही. त्यासाठी सागर लक्ष्मण सोनवणे विरुद्ध महाराष्ट्र राज्य या केसचा संदर्भ आरोपीच्या वकिलांनी दिला आणि त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी ऍड. सुरज संजय शिंदे यांनी केली होती.
साक्षिदारांवर दबाव न आणणे, न्यायालयाच्या प्रत्येक तारखेला हजर राहणे, तपासाकामी पोलिसांना सहकार्य करणे या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. जुलै 2022 दरम्यान तळेगाव दाभाडे भागात हा प्रकार घडला होता. त्यासाठी हरीष शर्मा याने तळेगाव दाभाडे पोलिसात फिर्याद दिली होती. ( Vadgaon Maval Court Grants Bail To Accused In Extortion And Robbery Case )
अधिक वाचा –
– पिंपरी चिंचवडमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक – व्हिडिओ
– चालकाविना धावणारा ट्रक, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताचा थरार – व्हिडिओ
– मोठी बातमी! 13 डिसेंबरपर्यंत पुणे-लोणावळा लोकल रेल्वेच्या 10 फेऱ्या बंद, पाहा यादी