Dainik Maval News : जलसंपदा विभागाने पवना धरण परिसरातील अतिक्रमण धारकांना नोटीसा देऊन अतिक्रमण काढण्याच्या आदेश दिले आहेत. याबाबत पवना धरणग्रस्त कृती समितीचे जलसंपदा विभागाला निवेदन दिले आहे. यात त्यांनी नोटीसला विरोध दर्शवला आहे.
काय आहे निवेदन –
पवना धरण परिसरातील अतिरिक्त संपादन जागेवर पवना धरणग्रस्त तरुणांनी आपापल्या परीने छोटे मोठे कृषी पर्यटन केंद्र सुरू केली असुन गेल्या काही वर्षात याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढल्याने या भागातील रोजगार वाढला असून धरणग्रस्त तरुणांचा हा मुख्य व्यवसाय झाला आहे. गेली ५०/५५ वर्षांपासून धरणग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असून शासनस्तरावर व मुंबई उच्च न्यायालयात न्यायासाठी प्रयत्न करत आहे.
जोपर्यंत न्यायालयात न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही लढा सुरूच ठेवणार आहे. आम्हाला जलसंपदा विभागाकडून अतिक्रमण काढण्यासाठी वारंवार नोटीसा येत आहे, त्या बंद कराव्या. अन्यथा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असुन होण्याऱ्या परिणामाला समोरे जाण्याच्या इशारा, धरणग्रस्त कृती समितीने निवेदनाद्वारे जलसंपदा विभागाला दिला आहे.
यावेळी धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष नारायण बोडके, पवना कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मोहोळ, रविकांत रसाळ, दत्तात्रय ठाकर, बाळासाहेब काळे,राम कालेकर,किसन घरदाळे,मारुती दळवी,सिताबाई डोंगरे आदी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव मावळ न्यायालयासाठी मंजूर १०९ कोटी निधीतून भव्य इमारत उभारण्याचा निर्णय ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थित बैठक संपन्न
– गाडीची पीयूसी सोबत नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही? पाहा काय आहे सरकारचे नवीन धोरण । No PUC No Fuel Initiative
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित
