Dainik Maval News : काही महिन्यांत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मावळ तालुक्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतल्याचे दिसत आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) आपल्या संघटन वाढीकडे आणि बळकटीकरणाकडे लक्ष देत असल्याचे दिसत आहे.
सोमवारी (दि. १५ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवन मावळ विभागाची पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाची भविष्यातील दिशा, संघटन बळकटी, स्थानिक प्रश्न आणि आगामी राजकीय घडामोडी याबाबत सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीला आमदार सुनील शेळके यांची प्रमुख उपस्थिती होते. यांसह तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांसह यावेळी सर्व सेल अध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत पक्षशक्ती अधिक प्रभावी करण्यासाठी आणि जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी ठोस कार्यक्रम आखण्यात आले. आमदार शेळके यांनी कार्यकर्त्यांच्या सूचना, विचार आणि अनुभव ऐकून त्यांची नोंद घेण्यात आली.
मावळ विधानसभा अधिक सबळ, संघटित आणि कार्यक्षम व्हावी, यासाठी पक्षपातळीवर सातत्याने अशा आढावा बैठका घेतल्या जातील, असे यावेळी सांगण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena