Dainik Maval News : कामगार नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड एसटी वर्कर्स काँग्रेस या संघटनेचे पुणे विभागातील तळेगाव आगार येथे फलकाचे अनावरण गुरुवारी (दि. १८) संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रीतीश छाजेड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आगारातील बहुसंख्य पदाधिकारी कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये अध्यक्ष छाजेड यांचे स्वागत करण्यात आले. आगार प्रशासक यांची भेट घेऊन प्रशासनाने कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय करू नये, सर्वांना समान वागणूक देण्यात यावी अशी मागणी अध्यक्ष प्रीतीश छाजेड यांनी दिला. त्यानंतर बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीस संघटनेचे राज्य सरचिटणीस आर.डी. गवळी, पुणे विभागाचे विभागीय सचिव राज्य तथा राज्य कार्याध्यक्ष रमेश शिंदे, राज्य कार्याध्यक्ष अशोकराव जाधव, राज्य महिला आघाडी प्रमुख प्रदेश अध्यक्षा अर्चना भोमले आदींनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षांनी मार्गदर्शन करताना, कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही जर प्रशासनाने अन्याय केला तर वेळप्रसंगी प्रशासनाविरुद्ध संघर्ष करण्यास संघटना मागे पुढे पाहणार नाही. बैठकीच्या शेवटी अमोल रणदिवे यांनी आभार मानले. बैठकीस तळेगाव आगाराचे अध्यक्ष कैलास राऊत, सचिव रंजीत वाघमारे, विभागीय कार्याध्यक्ष अमोल रणदिवे यांच्यासह अनेक पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक
– तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल
– आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP
– देहूरोड जवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात ; 2 जण जागीच ठार । Maval News
