व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे येथे त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करा - पणन मंत्री

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 18, 2025
in लोकल, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Make arrangements to provide training at National Institute of Post-Harvest Technology Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT) प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. या बरोबर परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार करुन देशातील तसेच परदेशातील प्रशिक्षणार्थींना जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी. सोयी उपलब्ध करण्याचे निर्देश राज्याचे पणन मंत्री तथा राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान (NIPHT) संस्थेचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिले.

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे या संस्थेच्या नियामक मंडळाच्या बुधवारी (दि.१७) आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे संचालक श्री मिलिंद आकरे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे व्यवस्थापक रविंद्र देशमुख व विश्वास जाधव आदी उपस्थित होते.

रावल म्हणाले, प्रशिक्षणाच्या अनुषंगाने प्रथमक्रमांने नेदरलँड इस्रायल,जपान व तांझानिया या देशातील विद्यापीठांशी सहकार्य करून राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत प्रशिक्षण वर्ग सुरु करावे. संस्थेत नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम व उपक्रम राबवण्यासाठी सल्लागार समिती गठित करावी.

या समितीत कृषी विभागातील, कृषी विद्यापीठातील तज्ञ अधिकारी, भारतीय कृषी संशोधन परिषद-काढणी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंदीय संस्था, लुधीयाना, राष्ट्रीय कृषी विपणन संस्था, जयपूर येथील तज्ज्ञ अधिकारी, बी-बियाणे कंपनींचे प्रतिनिधी, खत उत्पादक कंपन्यांचे प्रतीनिधी, अन्न प्रक्रीया उद्योगामध्ये काम करणाऱ्या नामवंत कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच खाजगी क्षेत्रातील प्रशिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश करण्याचा सूचना रावल यांनी दिल्या.

संस्थेची सभासद संख्या वाढविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याबाबत यावी. त्यानुसार राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी फेडरेशन, साखर कारखाने, विविध कार्यकारी सोसायट्या, कापूस फेडरेशन व मार्केटींग फेडरेशन आदी संस्थांना सभासद करावे. प्रत्येक बाजार समितींच्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये प्रशिक्षणासाठी तरतूद करावी तसेच बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्याना माहीती करुन देण्यात यावी असेही रावल म्हणाले.

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे येथे त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करा. जागतिक पातळीवरील सुगी पश्चात तंत्रज्ञान राज्यातील व देशातील शेतकऱ्याना उपलब्ध करण्यासाठी एक्झिबिशन सेंटर सुरू करावे. बदलत्या काळानुसार संस्थेमध्ये ड्रोन चालक प्रशिक्षण सुरु करावे. तसेच कृषी पर्यटन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यास मान्यता दिली. या माध्यमातून शेतकऱ्याना सुगी पश्चात तंत्रज्ञानाची माहिती देण्याचा सूचना रावल यांनी केल्या.

यावेळी आकरे यांनी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेमध्ये त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करणे, परदेशी विद्यापीठाशी सामंजस्य करार करणे, नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम व उपक्रम राबवणे, संस्थेचे सभासद संख्या वाढविणे, बाजार समितीच्या अर्थसंकल्पामध्ये प्रशिक्षणासाठी वाढीव तरतूद करणे आदी विषयांवर सादरीकरण करण्यात आले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena


dainik maval jahirat

Previous Post

व्यासंगी इतिहास संशोधकाला महाराष्ट्र मुकला ; ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन । Gajanan Mehendale Passes Away

Next Post

व्हिडिओ : आगामी सण – उत्सव निवडणुकीच्या अनुषंगाने वडगाव मावळ पोलिसांचा शहरात रूट मार्च । Vadgaon Maval Police

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Maval Police conducts route march in the city in connection with upcoming festivals elections

व्हिडिओ : आगामी सण - उत्सव निवडणुकीच्या अनुषंगाने वडगाव मावळ पोलिसांचा शहरात रूट मार्च । Vadgaon Maval Police

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.