Dainik Maval News : पीएमपीएमएल प्रशासनाने वारकरी भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी श्रीक्षेत्र देहू ते श्री क्षेत्र भंडारा डोंगर या नव्या बससेवेचा प्रारंभ केला आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांची जन्म, कर्मभूमी देहू नगरीपासून ते त्यांच्या तपोभूमी श्री क्षेत्र भंडारा डोंगरापर्यंत भाविकांसाठी आता ही थेट बससेवा सुरु करण्यात आली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) सुरू केलेल्या या बससेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आला असून या बससेवेमुळे भाविकांना येणे- जाणे सोयीचे होणार आहे. देहू ते भंडारा डोंगर बससेवेचा शुभारंभ प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष माऊली दाभाडे, रवींद्र भेगडे आणि भंडारा डोंगर संस्थांचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून देहू, आळंदी आणि भंडारा डोंगरवर वर्षभर भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र डोंगरावर पायी जायला तीस ते चाळीस मिनिट लागतात. मात्र या बससेवेमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बसच्या दिवसभरात एकूण सात फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे भाविकांना सोयीस्कर प्रवास करून दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
उपक्रमाबद्दल भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष हभप बाळासाहेब महाराज काशीद पाटील आणि मावळ भाजप नेते रविंद्र भेगडे यांनी भाविकांना सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. “ही बससेवा केवळ वाहतुकीचे साधन नसून, श्रद्धा आणि अध्यात्म जोडणारा पूल आहे. संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा वारसा भाविकांपर्यंत पोहोचविण्यास ती महत्त्वाची ठरेल,” असे प्रतिपादन बाळासाहेब महाराज काशीद पाटील यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक
– तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल
– आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP
– देहूरोड जवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात ; 2 जण जागीच ठार । Maval News
