Dainik Maval News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेनेला पूर्ण ताकदीने लढायच्या आहेत. त्यादृष्टीने सर्वांनी कामाला लागावे. शिवसेना एक परिवार आहे. त्यामुळे कोणीही गटबाजी करु नये, सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे, अशा सूचना शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिल्या.
शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळमधील पक्ष संघटनेत फेरबदल केले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे, मावळच्या जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हा संघटिकापदी शिला भोंडवे, मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती केली आहे.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते गुरुवारी सत्कार करण्यात आला. यावेळी उपनेत्या सुलभा उबाळे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव विश्वजित बारणे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप पांढरकर, राजेंद्र तरस, विशाल हुलावळे, शिवसेना महिला तालुका प्रमुख शुभांगी काळंगे, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस, माऊली जगताप, सुनिल हगवणे, मा नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, पिंपरी विधानसभा महिला संघटिका शैला निकम यांच्यास ह पिंपरी, चिंचवड व मावळ तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेत फेरबदल केले आहेत. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना काम करण्यास मोठी संधी मिळणार आहे. शिवसेनेचे जास्तीत-जास्त नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून आणायचे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आपल्या सर्वांच्या पाठिशी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने सर्वांनी कामाला लागावे.
सर्वांनी संपर्क वाढवावा. शाखांची बांधणी करावी. तळागातील लोकांना संघटनेशी जोडावे. संघटना अधिक बळकट, मजबूत करावी. तरुणांना शिवसेनेशी जोडावे. शिवसेना हा एक परिवार आहे. त्यामुळे सर्वांनी परिवार म्हणून काम करावे. कोणीही गटबाजी करु नये, प्रत्येकाला विश्वासात घेऊन संघटना वाढवावी. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण, शासन आपल्या दारी, मुलींच्या शिक्षणासाठी मदत अशा विविध योजना राबविल्या आहेत. या योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. योजनांचा लाभ लोकांना मिळवून द्यावा.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक
– तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल
– आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP
– देहूरोड जवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात ; 2 जण जागीच ठार । Maval News
