Dainik Maval News : वडगाव ( Vadgaon Maval ) येथील मावळ विचार मंचने दरवर्षीप्रमाणे नवरात्रीनिमित्त सरस्वती व्याख्यानमाला आयोजित केली आहे. श्री पोटोबा महाराज देवस्थान यांच्या सहकार्याने मंदिराच्या प्रांगणात दिनांक २२ सप्टेंबर ते दिनांक १ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सायंकाळी ६:३० वाजता होणाऱ्या व्याख्यानमालेचे यंदा २५ वे वर्ष आहे.
व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथ दिंडी, दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, आरोग्य शिबीर आणि इतर स्पर्धा होणार असल्याची माहिती मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य व यावर्षीचे व्याख्यानमालेचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर यांनी दिली.
व्याख्यानमालेत सिने अभिनेते सुबोध भावे, सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड, शिव व्याख्याते नितीन बानगुडे पाटील, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे अशा अनेक मातब्बर वक्त्यांना ऐकण्याची संधी मावळकरांना मिळणार आहे.
व्याख्यानमालेत दररोज विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्यात अनुक्रमे ऑलिंपिक वीर मारुती आडकर, क्रीडा प्रशिक्षक सुधीर म्हाळसकर, व्याख्याते विवेक गुरव, शिवशंकर स्वामी, रोहिदास लखिमले, ॲड शंकरराव ढोरे, उद्योजक विलास काळोखे, अमोल पोफळे, सविता सुराणा यांचा समावेश आहे.
अजित देशपांडे, ॲड दामोदर भंडारी, धनश्री भोंडवे, आरती राऊत, गिरीश गुजराणी, संतोष भालेराव, अतुल म्हाळसकर आदींनी याचे संयोजन केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक
– तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल
– आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP
– देहूरोड जवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात ; 2 जण जागीच ठार । Maval News
