Dainik Maval News : जय बजरंग तालीम ट्रस्टच्या वतीने स्वर्गीय पै. केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ वडगाव येथे बैलपोळा सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.
बैलपोळा हा सण शेती संस्कृतीचा आत्मा मानला जातो. शेतकऱ्याचा खरा सखा – बैल – याच्या परिश्रमांची आठवण करून देणारा, त्याच्या कार्याची कृतज्ञतेने आठवण ठेवणारा हा सण दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर, वडगाव येथे जय बजरंग तालीम ट्रस्टच्या वतीने स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ सालाबाद प्रमाने याही वर्षी भव्य शेतकरी सन्मान सोहळा आयोजित करण्यात येत आहे.
स्व. पैलवान केशवराव ढोरे हे आपल्या कार्यकुशलतेसाठी, कुस्ती क्षेत्रासाठी, समाजप्रेमासाठी आणि शेतकऱ्यांप्रती असलेल्या आत्मीयतेसाठी प्रसिद्ध होते. ते या वडगाव चे कारभारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात येत असलेला हा सन्मान सोहळा म्हणजे त्यांच्या विचारांची आणि कर्तृत्वाची जाणीव ठेवणारा एक समाजाभिमुख उपक्रम आहे.
या कार्यक्रमात वडगाव तसेच परिसरातील अनेक शेतकरी बांधवांना सन्मानित करण्यात येणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक
– तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल
– आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP
– देहूरोड जवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात ; 2 जण जागीच ठार । Maval News
