Dainik Maval News : मावळ लोकसभा मतदारसंघातील हॅटट्रीक खासदार, श्रीरंग बारणे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात दिलेल्या माहितीत विसंगती आढळून आली असून त्यांनी गुन्हे लपविल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी आता वडगाव मावळ कोर्टाच खटला चालविला जाणार आहे. ह्या प्रकरणास वडगाव विशेष न्यायालयाने मंजूर दिली असून खटला चालविण्यास आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खा. श्रीरंग बारणे यांनी निवडणुकांच्या वेळी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार अनिल भांगरे आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी न्यायालयाकडे केली होती. बारणे यांनी २००९ आणि २०१९ च्या निवडणुकांदरम्यान नामनिर्देशन पत्रासोबत दिलेल्या शपथपत्रात जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
२०१९ च्या शपथपत्रात बारणे यांनी शैक्षणिक पात्रता ‘दहावी नापास’ अशी नमूद केली होती, तर २००९ मध्ये त्यांनी ‘दहावी उत्तीर्ण, सन १९८९’ असे लिहिले होते. याशिवाय, त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात पिंपरी न्यायालयातील एक प्रकरण आणि निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा समावेश आहे.
न्यायालयाने शपथपत्रांमधील शैक्षणिक पात्रतेतील विसंगती आणि प्रलंबित प्रकरणांविषयी दिलेली अपुरी माहिती लक्षात घेतली. न्यायालयान याबाबत वडगाव मावळ पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. पोलिसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या अहवालानंतर डॉ. हरिदास यांनी युक्तिवाद केला. या निष्कर्षांच्या आधारे न्यायालयाने बारणे यांच्याविरोधात लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम १२५-अ अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यास पुरेशी कारणे असल्याचे नमूद केले असून त्याविरोधात प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रारदार अनिल भांगरे यांनी सांगितलं की, आम्ही सन २०२१ पासून या प्रकरणाची तक्रार केली असून त्याबाबत न्यायालयाकडे पाठपुरावा केला जात आहे. अखेर न्यायालयाने खटला सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक
– तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल
– आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP
– देहूरोड जवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात ; 2 जण जागीच ठार । Maval News