Dainik Maval News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यात उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो उद्यान योजनेची घोषणा केली आहे. यानुसार, राज्यातील एकूण ३९४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान वर्षभरात विकसित करण्यात येणार आहेत.
राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण व नवीन नगरपंचायत, नगरपालिका योजनेअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार मावळ तालुक्यातील दोन नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींना प्रत्येकी एक कोटी निधी उपलब्ध झाला आहे.
मावळ तालुक्यातील लोणावळा नगर परिषद, तळेगाव दाभाडे नगर परिषद, वडगाव नगर पंचायत आणि देहू नगर पंचायत या चारही स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता हा निधी उपलब्ध झाला असून त्यास प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. या निधीतून शहरांतील उद्यान विकासाला चालना मिळणार आहे. तसेच नागरिकांना विरंगुळ्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होणार आहे.
या निधीबद्दल बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, “मावळ तालुक्यातील शहरी भागांच्या विकासासाठी हा निधी महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना दर्जेदार सुविधा मिळतील. मावळच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.”
आमदार शेळके यांनी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले. हा निधी केवळ मनोरंजनाचे साधन नसून, लोणावळ्यातील सामाजिक आणि आरोग्य संवर्धनाचे केंद्र बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक
– तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल
– आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP
– देहूरोड जवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात ; 2 जण जागीच ठार । Maval News
